चाळीसगावातील खडकी बायपास शिवारात भरदिवसा घरफोडी ; 70 हजारांची रोकड लंपास


Daylight burglary in the Khadki Bypass area of ​​Chalisgaon ; ₹70,000 in cash stolen चाळीसगाव (2 जुलै 2026) : चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील खडकी बायपास परिसरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करीत 70 हजारांची रोकड लांबवली. भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण ?
खडकी बायपास येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोर राहणारे रोहीदास शांताराम मराठे यांचे केळीच्या वेफर्सचे दुकान आहे. बुधवार, 1 रोजी दुपारी सुमारे अडीच ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली 70 हजारांची रोकड चोरून आरोपीने पलायन केले.



रोहिदास मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश मांडोळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !