जामनेरातील पुरवठा निरीक्षकांकडेच मागितली खंडणी : दोघांविरोधात गुन्हा
जामनेर : जामनेर पुरवठा निरीक्षक यांच्याकडे दीड लाखाची खंडणी मागणार्या दोघांवर जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
दोघांविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रवींद्र आत्माराम पवार याने जामनेर तहसील कार्यलयातील पुरवठा निरीक्षक विठ्ठल मच्छीद्रनाथ काकडे यांना त्याच्याकडे रेशन माल अफरातफर प्रकरणाचा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली हेाती. काकडे यांनी जामनेर पोलिसात तक्रार केल्यानंतर रवींद्र आत्माराम पवार व दीपक गायकवाड (वाकोद, ता.जामनेर). यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

क्लीप व्हायरलची धमकी देत मागितले दिड लाख
काकडे हे जामनेर येथे पुरवठा निरीक्षक या पदावर सुमारे तीन वर्षापासून कार्यरत आहेत. जामनेर तालुक्यातील रेशन दुकान तपासणी, पेट्रोलपंप तपासणी, शासकिय धान्य खरेदी विक्री, गॅस एजन्सी तपासणीचे कामकाज त्यांच्याकडे आहे. काकडे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्यानंतर शुक्रवार, 20 मे रोजी शेंदुर्णी, ता.जामनेर येथील रवींद्र आत्माराम पवार हे तहसील कार्यालयात दुपारी तीन वाजता आले. तुम्ही रेशनचा माल दुसरीकडे सप्लाय करीत होते, अशी माझ्याकडे तुमचे व्हीडीओ चित्रण असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांना सदरचा माल पाठविण्यास मीच सांगितले होता परंतु मी नियमाप्रमाणे काम केले असल्याचे सांगितले त्यानंतर मंगळवार, 24 मे रोजी पुन्हा रवींद्र सीताराम पवार व त्याच्या सोबत दीपक गायकवाड (रा.वाकोद, ता.जामनेर) हे तहसील कार्यालयात आले व तुमचे व्हिडिीओ चित्रीकरण माझ्याकडे आहे, तुम्ही काहीतरी सेटलमेंट करा नाहीतर तुमचा व्हीडीओ व्हयरल करुन तुमची बदनामी करेल, अशी धमकी दिली.शुक्रवार, 27 मे रोजी सकाळी 11 वाजेचे सुमारास तहसील कार्यालय जामनेर येथे रेशन गोडावुनमध्ये सरकारी काम करीत असतांना रवींद्र सीताराम पवार (रा.शेंदुर्णी) व त्याचे सोबत दीपक गायकवाड (पूर्ण नाव माहीत नाही, रा.वाकोद, ता.जामनेर) यांनी मला फोन करून तहसील कार्यालयात बोलावल्यानंतर दोन्ही संशयीतांनी दमदाटी केली व दिड लाख न दिल्यास मी तुमची व्हिडिओ क्लीप व्हायरल करीन व तुमची बदनामी करून तुम्हाला निलंबित करेल, तुमचे प्रमोशन होवु देणार नाही, अशी धमकी दिली. संशयीतांना चुकीचे काम केले नसल्याचे सांगितले व त्यांना मोबाईवर रेकॉर्डींग सुरू असल्याचा संशय आल्याने त्यांनी मारण्याची व पाहून घेण्याची धमकी दिली. तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
मारहाणीच्या गुन्ह्यातीन वर्षांपासून वास्तव्य बदलून राहणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात







