एमआयडीसी परीसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण


जळगाव : शहरातील एमआयडीसी भागातील एन.सेक्टरमधून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
एमआयडीसी परीसरातील एन.सेक्टर येथे अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवार, 25 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला नातेवाईकांकडे ही विचारपूस केली मात्र तरीही मुलीचा शोध लागला नाही. मुलीला कुणीतरी काहीतरी फुस लावून पळवून गेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त करीत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

जामनेरातील पुरवठा निरीक्षकांकडेच मागितली खंडणी : दोघांविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !