गोजोरा गावातील बीएस्सीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या
भुसावळ : तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी व भुसावळातील पु.ओ.नाहाटा कॉलेजमध्ये बीएस्सीच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी स्वप्निल सुभाष भिरूड (20) याने रविवारी सायंकाळी 6.30 वाजता राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमागील कारण मात्र समोर आले नाही.
गाजीपूरच्या युवतीला पळवले : आरोपीला भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून अटक
गोजोरा गावात शोककळा
स्वप्निल भुसावळ येथील नाहाटा कॉलेजमध्ये बीएस्सीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेतो. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना त्याने त्याने छताच्या लोखंडी हुकला दोरी व पांढर्या कपडा बांधून गळफास घेतला. स्वप्निलचे वडील सुभाष भिरूड हे घरी आल्यावर आवाज देऊनही कुणी दरवाजा उघडला नाही. यामुळे परीसरातील रहिवासी धावून आले. त्यांनी दरवाजा तोडून गळफास घेतलेल्या सचिनला खाली उतरवून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये नेले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल पवार यांनी ट्रामा केअर सेंटर गाठले. पोलिस पाटील विनोद सपकाळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तीन गावठी कट्टे व 14 जिवंत काडतुसासह दरोडेखोर जाळ्यात : दरोड्याचा डाव उधळला







