!-- afp header code starts here -->

साडेसात लाखांच्या गुटख्यासह औरंगाबादचे संशयीत जामनेर पोलिसांच्या जाळ्यात

नेरी रस्त्यावर भल्या पहाटेची कारवाई : 15 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त


जामनेर : जामनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सात लाख 48 हजारांच्या गुटख्यासह औरंगाबादच्या गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जामनेर तालुक्यातील नेरी टोल नाक्याजवळ सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वाहनासह 15 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुसावळातील ‘त्या’ अनोळखीचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू : खुनाची शक्यता मावळली

गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक ते नेरी टोल नाका दरम्यान चारचाकी (एम.एच.20 ई.एल.7552) मधून बेकायदेशीररीत्या गुटखा, पानमसाला, तंबाखू ची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी 30 मे रोजी पहाटे चार वाजेपासून पथकासह सापळा रचला होता. पहाटे सहा वाजेच्या सुमारास संशयीत वाहन आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने वाहनासह दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सात लाख 48 हजार 800 रुपये किंमतीच्या गुटख्यासह आठ लाख रुपये किंमतीचा टेम्पो वाहन मिळून 15 लाख 48 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी सोहेल जाफर शेख (21) व सचिन शंकर बनकर (26, दोन्ही रा.बालाजी नगर, औरंगाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सावद्यात महावितरण कंपनीची मनमानी : अवघ्या 354 रुपयांसाठी वीज जोडणी थांबवली

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात हवालदार रमेश कुमावत, हवालदार चालक काळे, कॉन्स्टेबल तुषार पाटील, निलेश घुगे आदींच्या पथकाने केली.

 

गोजोरा गावातील बीएस्सीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !