शिरपूर तालुक्यात महिलेचा खून करून मृतदेह जाळला
शिरपूर : तालुक्यातील नटवाडे शिवारात करवंद नटवाडे रस्त्यावर 30 वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा खून नेमका कुणी व कोणत्या कारणावरून केला? मयत नेमकी महिला कुठली ? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पोलिस अधिकार्यांची धाव
याबाबत नटवाडे येथील पोलीस पाटील प्रकाश मालसिंग पावरा यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक किरण बार्हे, हवालदार प्रेमसिंग गिरासे, पंकज पाटील, भरत चव्हाण, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, प्रशांत पवार आदी कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली.

गोजोरा गावातील बीएस्सीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या







