जळगाव शहरात धाडसी घरफोडी : सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला
जळगाव : बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असून शहरातील स्टेटबँक कॉलनीतील निर्णयसागर अपार्टमेंटमधील बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख 28 हजारांचा ऐवज लांबवला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीच्या पाच दुचाकींसह ‘सलमान खान’ला धुळ्यात अटक
बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
रींग रोडवरील निर्णयसागर अपार्टमेंटमध्ये ज्योती प्रमोद पाटील (52), या फ्लॅट नं.2 मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत तर वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये त्यांच्या सासुबाई एकट्याच राहतात. त्यांचे पती प्रमोद पाटील जिल्हा न्यायालयात वकील असून मुलगा वरुण पुणे येथे नोकरीला आहे. पाटील कुटूंबीय 18 मे पासून फ्लॅटबंद करुन पुणे येथे मुलाकडे गेले होते तर वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारे त्यांच्या सासू येवून-जावुन लक्ष ठेवत होत्या.

चोरीमुळे उडाली खळबळ
सोमवार, 30 मे रोजी ज्योती पाटील मुलगी मेघासह जळगावी परतल्या. घरी आल्यावर त्यांना फ्लॅटचे मुख्यदार तोडलेले आढळून आले. त्यांनी शेजार्यांना आरडाओरड करुन बोलावल्यावर अशोक जोशी यांनी तत्काळ धाव घेत पोलिसांना पाचारण केले. चोरट्यांनी दाराचा कडीकोयंडा तोडून आतील कपाटातील रोकड, दागिने, बँकेचे पासबुक, आधारकार्ड पॅनकार्ड, एटिएम कार्ड असे साहित्य चेारुन नेल्याचे आढळून आले.
जिल्हा पेठ पोलिसांची धाव
चोरीची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. डॉगस्कॉड, ठसे तज्ञांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरुन काही पुरावे संकलीत करीत पंचनामा केल्यावर ज्योती पाटील यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरट्यांनी पाटील यांच्या बेडरुम मधील कपाटातून एक लाख 94 हजारांची रोकड, तीन हजार रुपये किंमतीचे दोन चांदीचे ग्लास, ब्रिटीशकालीन चांदीचे नाणे, तीन हजारांच्या पायातील चांदीच्या साकळ्या, एक ग्रॅम सेान्याचा शिक्का, 15 ग्रॅम वजनाचे 5 चांदिचे शिक्के, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, बँकऑफ इंडियाचे एटिएम, पॅन कार्ड लांबवले.
अपार्टमेंटमधील अन्य फ्लॅटमध्येही चोरी
निर्णय सागर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 4 व 5 मधील रहिवासी छाया प्रकाश महाजन यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख 30 हजारांची सोन्याची चैन, 23 हजार रुपये किंमतीचे सेान्याचे मणी, 33 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे जोड, 49 हजारांची नाकातील नथ, पाच हजार 600 रुपयांचे हातातील वाळे, चांदीच्या तोरड्या, एक तोळा सेान्याचे पेंडल, एक लाख आठ हजार रुपयांचा पाच भार वजनाचा चांदीचा कंबरपट्टा, लाकडी कपाटातून एक लाख 25 हजार ररोख मिळून तीन लाख 28 हजार 400 रुपयांचा एकुण ऐवज लांबवला.
अहिरवाडी परीसरात वादळी वार्याने केळीला मोठा फटका







