विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू
जामनेर : विजेच्या धक्क्याने 34 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेवगा पिंप्री येथे घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल मदन राठोड (34) असे मयताचे नाव आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
गोपाल राठोड हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार 1 जून रोजी दुपारी विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड करीत आहे.








