!-- afp header code starts here -->

पावणेदोन लाखांची रोकड चहाच्या टपरीतून चोरट्यांनी लांबवली


जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील चहाच्या टपरीतून एक लाख 75 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांचा पोलिसांकडून शोध
भिका लिंगा गवळी (38, दालफळ गवळी, शनिपेठ) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून महात्मा गांधी मार्केट समोर चहाची टपरी असून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 1 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या चहाच्या टपरीजवळ उभे असतांना चार अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकाने चहाच्या टपरीत ठेवलेली बॅगेतून एक लाख 75 हजाराची रोकड लांबविली. हा प्रकार लक्षात आल्यावर भिका गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुरूवार, 2 जून रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !