केर्हाळ्यातील खुनाचा उलगडा : दोघा आरोपींना अटक
अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपींनी खुन केल्याची कबुली
रावेर : चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या रावेर तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अवघ्या आठ तासात पोलिसांनी तपासचक्र फिरवत खुनाचा उलगडा केला असून दोघा आरोपींना अटक केली आहे. कैलास गुना गाढे ( 57) व लक्ष्मण किसन निकम (60, रा.केर्हाळा खुर्द) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मयतांशी अनैतिक संबंध असल्याची कबुली देत मयतांचे आणखी काहींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांचा काटा काढल्याची कबुली पोलिस तपासात दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी खून
तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास म्हशी व बकर्यांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या मात्र रात्र होऊनही त्या दोन्ही घरी न परतल्याने त्यांचा शोध घरच्या लोकांकडून केर्हाव परीसरातील शेत शिवारात सुरू करण्यात आला मात्र दुसर्या दिवसापर्यंतही शोध न लागल्याने पुन्हा शेत-शिवारात शोध मोहिम सकाळपासून दोन्ही महिलांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून राबवली जात असताना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात मजूर महिला नसीमा यांचा मृतदेह केर्हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या शेतात तर शालूबाईचा मृतदेह केर्हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच%



