15 जूनपासून वाजणार शाळेची पहिली घंटा : गणवेश, पुस्तकांनी होणार स्वागत

शाळा परीसर सजणार : शाळेची गोडी वाढण्यासाठी पुष्पगुच्छ देवून होणार स्वागत


The first school bell will ring from June 15: Uniforms, Books Will be Welcomed भुसावळ : दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर जून महिन्याच्या बुधवार, 15 जूनपासून सर्वत्र शाळांना सुरूवात होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके व गणवेश देवून स्वागत करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. भुसावळ तालुक्यातील चार हजार 733 विद्यार्थ्यांसाठी 28 लाख 39 हजार 800 रूपयांचा निधी तालुका स्तरावर प्राप्त झाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या परीपत्रकानुसार सोमवार, 13 जुनपासून शाळा सुरू होत असल्यातरी सुरूवातीचे दोन दिवस शिक्षक शाळेत येवून शाळेच्या स्वच्छतेसह सौंदर्यीकरणाबाबत उपाययोजना करणार आहेत.

बुधवारी होणार पालक मेळावा
बुधवार, 15 जून रोजी शाळेचा पहिला दिवस असून या दिवशी प्रत्येक शाळेत पालक संपर्क मेळाव्याचे आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परीषदेच्या शाळा तसेच पालिका शाळेत होणार्‍या या मेळाव्यात पालकांशी हितगुज करण्यात येईल तसेच वर्षभरातील उपक्रम, विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सूचना यावेळी सांगण्यात येतील तसेच अन्य बाबींवर या मेळाव्यात चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर वातावरण प्रसन्न वाटण्यासाठी शाळेसह परीसराची स्वच्छता करण्यावर भर दिला जात आह.

कोरोनामुळे प्रशासनाकडून सतर्कवर भर
दोन वर्षानंतरही कोरोना नियंत्रणात असलातरी पुन्हा त्याचा उद्रेक न वाढण्यासाठी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येईल तसेच आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे तापमानही मोजण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके दिली जातील शिवाय नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले जाणार आहे. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह तालुक्यातील 65 जि.प. व पालिकेच्या शाळेत दोन दिवस सफाई अभियान राबविले जाईल.

शालेय साहित्याचे दर वाढले
दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शालेय वस्तूंना अल्प मागणी राहिली मात्र आता शाळा सुरू होत असल्याने शालेय वस्तूंचे दर वधाले आहेत. वह्या, पुस्तकांसह पेन, वॉटर बॅग, टिफिन बॉक्स, दप्तर या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. यंदा पहिल्या दिवसापासून नियमित पूर्णवेळ शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांना यंदा महागाईची झळ सहन करावी लागत आहे.

जळगावात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !