भुसावळात वटपौर्णिमेनिमित्त मीना लोणारी यांच्याहस्ते दोन हजार सुवासिनींना वाण

सन्मान नारीशक्तीचा, जागर संस्कृती उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


On the occasion of Vat Pournima in Bhusawal, two thousand Suvasinis were blessed with varieties by Meena Lonari भुसावळ (30 जून 2026) : वैदिक हिंदू धर्माची सनातनी परंपरा जोपासत भाजपा गटनेते युवराज लोणारी यांच्या पत्नी व माजी शिक्षण समिती सभापती मीना लोणारी यांनी वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त परिसरातील दोन महिलांचा वाण देऊन सन्मान केला. सलग सहाव्या वर्षी पदरमोड करून राबविलेल्या या उपक्रमाने भुसावळात नारीशक्तीच्या सन्मानासोबतच संस्कृतीच्या जागराचा संदेश दिला.

नाना नानी उद्यानात सावित्रींचा मेळा
सोमवार, 29 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत स्व. अटलबिहारी वाजपेयी नाना नानी उद्यान, काशीराम नगर, भुसावळ येथे वटपौर्णिमेचा सन्मान सोहळा झाला. वडाच्या झाडाची प्रतिकृती, भगव्या पताका व फुलांच्या सजावटीने सजलेल्या मंडपात पारंपरिक वेशभूषेतील महिलांची मोठी गर्दी झाली होती. वटपूजेसाठी आलेल्या प्रत्येक भगिनीला सौ. मीना लोणारी यांनी स्वतः भेटवस्तू देऊन ओटी भरली.



वारसा वृद्धिगत व्हावा हीच भूमिका
हिंदू धर्माची ही संस्कृती येणार्‍या पिढींना समजावी व हा वारसा वृद्धिगत व्हावा, अशी माझी भूमिका आहे. आजची महिला कुटुंबाचा आधार आहे. तिच्या त्यागाला शाबासकी मिळायलाच हवी, अशा भावना मीना लोणारी यांनी व्यक्त केल्या. गेल्या सहा वर्षांपासून कोणत्याही अपेक्षेशिवाय त्या हा उपक्रम राबवत आहेत. यंदा सुमारे दोन हजार महिलांनी या सोहळ्याचा लाभ घेतला.

यांची होती उपस्थिती
या भावनिक सोहळ्याला प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी, नगरसेविका सोनल महाजन, डॉ.छाया देशमुख-फालक, पूनम पाटील, पल्लवी कोलते, सीमा नरवाडे, आशा पाटील, मीनाक्षी धांडे व अनिता आंबेकर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. संस्कृती जपणारे असे उपक्रम समाजाला दिशा देतात, अशा शब्दांत रजनी सावकारे यांनी गौरवोद्गार काढले.

सहकार्‍यांचे परिश्रम, यशस्वी आयोजन
यशस्वीतेसाठी भाजपा गटनेते युवराज लोणारी, उद्धव झांबरे, संजय नारखेडे, निर्मला लोणारी, नयना झांबरे, वत्सला सोनवणे, सुनीता कोल्हे, गायत्री नारखेडे, यशोदा जयकर यांच्यासह परिसरातील असंख्य महिला भगिनींनी परिश्रम घेतले. पूजेसाठी ब्राह्मणांची व्यवस्थाही करण्यात आली होती.

नारीशक्तीला सलाम
कुटुंबासाठी अहोरात्र झटणार्‍या, स्वतःचा विचार न करता पती व मुलांचे आयुष्य वाढावे म्हणून प्रार्थना करणार्‍या आधुनिक सावित्रींचा सन्मान करण्याची ही परंपरा भुसावळकरांच्या मनात घर करून गेली आहे. संस्कृतीचा वसा जपत नारीशक्तीचा केलेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !