चाळीसगाव तालुक्यातील तांबोळेत धाडसी घरफोडी : चार लाखांच्या रोकडसह दोन तोळे वजनाची चैन लांबवली
Daring burglary in Tambole, Chalisgaon Taluka: Cash worth four lakhs and a gold chain weighing two tolas stolen चाळीसगाव (30 जून 2026) : चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधत तब्बल चार लाखांची रोकड व दोन तोळे वजनाची सोन्याची पोत लांबवली. धाडसी घरफोडीमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
माहितगार चोरट्याचे कृत्य
सूत्रांच्या माहितीनुसार, तांबोळे बु.॥ विलास रघुनाथ पाटील (48) हे शेतकरी वास्तव्यास आहेत. त्यांच्या बंद घरातील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी पेटीत ठेवलेली चार लाखांची रोकड तसेच दहा हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली. घरफोडीचा प्रकार 26 जून रोजी सकाळी 9.30 ते 28 जूनच्या रात्री 8.30 दरम्यान घडला. पाटील हे घरी आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती कळवल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माहितगार चोरट्याने ही घरफोडी केल्याचा संशय आहे. तपास सहा.पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अक्रम बेग करीत आहेत.


