वरणगावात स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा : दोन तास मांडला ठिय्या

वाढीव बिले कमी करण्यासह उपाय योजना करण्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे


Shiv Sena stages a massive protest against smart meters in Varangaon; holds a sit-in for two hours वरणगाव (30 जून 2026) : शहरासह ग्रामीण परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, गरिबांच्या घरात काहीच उपकरणे नसताना आलेले अव्वाच्या-सव्वा वीज, शेतात असलेले रोहित्र वारंवार जळण्यासह दुरुस्त होणे तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि बेकायदेशीररित्या घरात बसवले जात असलेल्या स्मार्ट मिटरला विरोध आदी विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रस्त झालेल्या नागरिकांसह शिवसैनिकांनी मंगळवार, 30 जुन रोजी सकाळी 10 वाजता वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यालयाबाहेर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतल्याने उप कार्यकारी अभियंता ग्रामीणचे एस.सी.पंचबुद्गे आणि शहराचे अभियंता ए.बी.कुंभारे यांनी लखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग
शिवसेनेच्या मोर्चात शहरासह परिसरातील शेतकरी, नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते , शिवसैनिक महिला पुरुष मोठ्या चारशे ते पाचशेच्या जवळपास संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.



बस स्टँड चौक ते वीज वितरण कार्यालय पायी धडक मोर्चा
मंगळवारी सकाळी 10 वाजता शिवसेना संपर्क कार्यालय बस स्टँड येथून चारशे ते पाचशे महिला पुरुषाच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन, विविध घोषणांनी बस स्टँड परिसर ते वीज वितरण कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. या मोर्चात शेतकरी, सामान्य माणूस, महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ठिय्या आंदोलनात अधिकार्‍यांची ग्वाही
गरिबांच्या घरात काहीच उपकरणे नसताना चाळीस हजार वीज बिले आल्याने हे बिल कमी करण्यात येईल तसेच स्मार्ट मीटर यापुढे बसविण्यात येणार नाही, शेतात रोहित्र तत्काळ दुरुस्त करण्यात येतील, खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख निलेश ठाकूर, शारप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, महिला तालुकाप्रमुख रेखा देशमुख, शिवसेना नगरसेविका गटनेत्या तृप्ती महाजन, नगरसेविका माला मेढे, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, अशफाख शहा, इरफान खाटिक, माजी नगरसेवक गणेश धनगर, उपतालुका संघटक सुरेश चौधरी, सुभाष चौधरी, निलेश सुरडकर, प्रशांत पाटील, युवा सेना तालुका प्रमुख विष्णू राणे, गणेश झोपे, रवींद्र कोल्हे, उपशहरप्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, सुखदेव धनगर, रवींद्र चौधरी, निलेश सुरडकर, कमलेश येवले, तळवेळचे सरपंच उल्हास भारसके, उप सरपंच किशोर कोळी, भुरा धरणे, आचेगाव ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे, अक्षय माळी, सुनील गोसावी, योगेश इंगळे योगेश कोळी, कृष्णा पूजारी, सर्वेश पाटील, यशवंत बढे, प्रकाश निकम, दिशा महाजन, श्रद्धा बेदरकर, जोहरे मॅडम, श्रावण जोहरे, जयंत सुरपटणे, फुलगावचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, संजय वंजारी, सागर वंजारी, अजय सोनार, प्रशांत पाटील, भगवान पाटील, राजू काठोके, पिंटू मंदावले यांच्यासह वरणगाव सह परिसरातील नागरिक महिला पुरुष, शिवसैनिक पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !