यावल तालुक्यातील धक्कादायक घटना : वाळूमाफियांकडून तलाठ्याला धक्काबुक्की ; वाळूचे ट्रॅक्टरही पळविले


यावल : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना दोणगाव ते डांभूर्णी दरम्यान घडली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महाविद्यालयात नोकरीच्या आमिषाने तरुणाला साडेतीन लाखांचा गंडा

तलाठ्याला धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर लांबवले
यावल तालुक्यातील दोणगाव ते डांभूर्णी दरम्यानच्या रस्त्यावरून बुधवार, 15 जून रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 19 बीजे 4538) तलाठी निलेश जानकीराम धांडे यांनी अडविले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालक गोलू खूशाल बाविस्कर (रा.पुनगाव, ता.चोपडा) याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तलाठी यांनी ट्रॅक्टर वाहन जप्त करून यावल तहसील कार्यालयात नेत असतांना चिंचोली येथील हायस्कूल जवळ ट्रॅक्टर मालक सचिन राजेंद्र बाविस्कर हा दुचाकीने डबलसिट चाला व त्याने ट्रक्टरवरून तलाठी निलेश धांडे यांना धक्काबुक्की करून खाली उतरविले आणि धमकी दिली. या प्रकरणी तलाठी निलेश धांडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गोलू खूशाल बाविस्कर, सचिन राजेंद्र बाविस्कर आणि एक अनोळखी मोटारसायकल स्वार यांच्यावर यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

जबरी चोरीतील जळगावातील पसार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !