चार उन्हाळी गाड्यांना लागणार स्लीपर कोच


भुसावळ : मध्य रेल्वेने तत्काळ प्रभावाने चार गाड्यांना प्रत्येकी एक शयनयान कोच (स्लीपर) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांना लागणार स्लीपर कोच
त्यात 02187 रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मुंबई उन्हाळी विशेष गाडी व 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मुंबई-रीरवा उन्हाळी विशेष गाडीचा समावेश आहे. या गाडीला आता एक प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह सहा सामान्य द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येतील तसेच 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-चेन्नई एग्मोर मेल, 22158 चेन्नई एग्मोर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मेल गाडीला आता एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 4 सामान्य द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येतील. या गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भुसावळातील नगरसेवक अपात्रता याचिकेवर आता 24 रोजी सुनावणी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !