पाणलोट क्षेत्रात मुसळधार : हतनूरचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले
भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील पूर्णा व तापी नदीच्या खोर्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 392.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आल्यानंतर शुक्रवारी हतनूरचे चार दरवाजे अर्धा मिटरने उघडून 112 क्युमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला.
मुलीशी का बोलतो म्हणत न्हावीत तरुणावर विळ्याने हल्ला
धरणात वाढली पाण्याची आवक
तापी खोर्यात केवळ टेक्सा व देडतलाई या दोनच केंद्रांवर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत अर्थात गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ दरम्यान हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात 393.2 मिमी पाऊस झाला. यामुळे पूर्णा नदीची ऐरडी येथील जलपातळी वाढली आहे. धरणात आवक वाढणार असल्याने शुक्रवारी दुपारी 12 वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग करण्यात आल्याने पूर्णा नदीची ऐरडी येथील जलपातळी वाढली आहे. धरणात आवक वाढणार असल्याने शुक्रवारी दुपारी 12 वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग करण्यात आला.