वर्धा पॅसेंजरमधील प्रवाशाच्या खून प्रकरणी आरोपीला कोठडी


भुसावळ : भुसावळ-वर्धा पॅसेंंजरमध्ये 18 डिसेंबर 2010 रोजी बमबम मनोज मंडल (32, रा.143, बरीयारपूर, जि.मुंगेर, बिहार) या प्रवाशाचा संशयीत आरोपी सौरभकुमार उर्फ पातो लक्ष्मी मंडल (20, पडिया, बासा, बरीयारपूर, मुंगेर, बिहार) याच्यासह अन्य एका आरोपीने चाकूचे वार करून खून केला होता. आरोपींना त्यावेळी लोहमार्ग गुन्हे शाखेने अटक केली होती मात्र त्यावेळी पातो लक्ष्मी मंडल हा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती मात्र 2011 मध्ये तो पसार होण्यात यशस्वी झाला होता. आरोपी सज्ञान झाल्याचे पोलिसांनी न्यायालयास कळवल्यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर मुंगेरी (बिहार) येथील कारागृहातून बिहार पोलिसांचे कमांडो पथक बुधवारी बंदोबस्तात संशयीताला घेऊन भुसावळात आल्यानंतर न्या.शिंदे यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर आरोपीला 3 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.संशयीतातर्फे अ‍ॅड.आर.एम.यादव तर अ‍ॅड.वैशाली साळवे यांनी बाजू मांडले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !