बोदवडमध्ये अवैध वृक्षतोड : वनविभागाचे दुर्लक्ष
बोदवड : शहर व तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड होत असताना वन विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असून दुसरीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा नारा शासन देत असताना तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.
दररोज झाडांची होतेय कत्तल
जामठी, नाडगाव, बोदवड, कोल्हाडी, उजनी, जलचक्र, शिररसाळा व बोदवड परीसरात ट्रॅक्टरमधून दररोज कत्तल झालेल्या झाडांची वाहतूक सुर आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत काही जागरूक नागरीकांनी तक्रारी करूनही वनविभागाने अद्याप काहीही कारवाई केली नसल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. शासनाची एकीकडे वृक्षारोपणासाठी मोहीम राबवली जाते, त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांना वाचवण्यासाठी एकही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दुर्दैव आहे.



