पतसंस्था चालकांची ईडीद्वारे व्हावी चौकशी
लोकशाही दिनात ठेवीदारांनी केली मागणी
भुसावळ : पतसंस्था चालकांची ईडीची कारवाई आणि पॅकेज तात्काळ मंजूर होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवून ठेवीदारांच्या त्यांच्या रक्कमा परत मिळाव्यात, अशी मागणी सोमवारी लोकशाही दिनात ठेवीदारांनी केली. ठेवीदारांच्या ठेवीच्या रक्कमा पतसंस्थामध्ये ठेवण्यात आल्या असून मुदत संपल्यावर सुध्दा ठेवीदारांना ठेवीच्या रक्कमा मिळत नसल्याने वारंवार तक्रारी करून सुध्दा ठेवीदार ठेवीच्या रक्कमा मिळण्यापासून वंचित अल्याचे गार्हाणे मांडण्यात आले.
ईडीने पतसंस्था चालकांची करावी चौकशी
पतसंस्था चालकांच्या ईडीच्या चौकश्या आहे मात्र त्यास मुहूर्त मिळत नाही. शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून ईडीच्या चौकशीला सुरूवात करावी तसेच ठेवीदारांच्या ठेवीच्या रक्कमा परत मिळण्यासाठी शासनाकडे पॅकेज प्रस्ताव पाठवावा, अशी तक्रार लोकशाही दिनात तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी खान्देश ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, महिला ठेवीदार संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते यांच्यासह अनेक ठेवीदारांनी लोकशाही दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती होती.



