पाळधीत खून : तासाभरात दोघे आरोपी जाळ्यात


पाळधी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघा आरोपींनी अंडा भुर्जी विक्रेत्याची डोक्यात रॉड टाकून तरूणाची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा पाण्याच्या पाटचारीजवळ घडली होती. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

दारूसाठी पैसे न दिल्याने खून
अंडाभुर्जी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या ज्ञानेश्वर गंभीर पाटील (30, रा.पाळधी) यांच्याकडे संशयीत आरोपी बबलू चैत्राम कोळी (26) व बळीराम मांगो कुंभार (सिल्लोडकर, 29, रा.दोन्ही रा.पाळधी) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले व पाटील यांनी देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपींंनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तासाभरात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

आरोपींना 1 पर्यंत पोलिस कोठडी
गुरुवारी अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !