खड्ड्यात पीकअप व्हॅन कोसळून 400 कोंबड्यांचा मृत्यू
जामनेर शहरातील घटना : 70 हजारांचे नुकसान
जामनेर : शहरातील अराफत चौकात खड्ड्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील 400 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजता घडली. या घटनेत 70 हजारांचे नुकसान झाले. भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्या पीकअप व्हॅन पडल्याने अपघात झाला. शेख कामील (अजिंठा) यांचे मालकिचे वाहन असून सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले.


