चाकूच्या धाकावर हमालाकडील 12 हजार लांबवले
12,000 from Hamal at knife point in Jalgaon जळगाव : हमालाच्या पोटाला चाकू लावून खिश्यातील 12 हजाराची रोकड लांबवण्यात आली. ही घटना शनिवार, 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नारीयल बाबा दर्ग्याजवळील महामार्गावर घडली. याप्रकरणी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे घेवून जात असताना लुटले
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील खेमराज भास्कर नारखेडे (50) हे भाजी मार्केटमध्ये धुडकू सपकाळे यांच्या आडत दुकानावर हमालीचे काम करतात. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुकानावर गेले असता, सपकाळे यांनी त्यांच्याकडे 12 हजार रुपये देत हे पैसे अर्जुन सोनार यांना सुप्रिम कॉलनी स्टॉप येथे जावून देण्यास सांगितले. त्यानुसार नारखेडे हे पैसे घेवून जात असतांना महामार्गावरील नारीयलबाबा दर्ग्याजवळ मागून दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी भास्कर नारखेडे यांची गाडी आडवी लावित त्यांना थांबविले आणि त्यापैकी एकाने कमरेला लावलेला चाकू काढून भास्कर नारखेडे यांच्या पोटाला लावला.

जीवे मारण्याची धमकी देत केली लूट
चोरट्यांनी तुझ्या खिशातील पैसे काढून दे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही असे सांगितले. तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी नारखेडे यांना पकडून ठेवत त्यांच्या खिशातून मोबाईल व रोख रक्कम काढून घेत चोरटे पसार झाले. ही घटना नारखेडे यांनी तात्काळ धुडकू सपकाळे यांना सांगितली. याबाबत रविवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
