The lure of getting a job cheated the young man for half five lakhs नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाला सव्वा पाच लाखात गंडवले


The lure of getting a job cheated the young man for half five lakhs पाचोरा : आखतवाडे येथील युवकाची शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पाच लाख 25 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. युवकाने दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारीअंती गुन्हा दाखल
आखतवाडे, ता.पाचोरा येथील गणेश मोतीलाल गढरी (32) यांना ‘शिपाई पदावर नोकरी लावून देतो, असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा.मोहलाई, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) यांचे परीचयातील सागर रतन बागुल (रा.एकलहरे, मेन गेट सामनगाव रोड, ता.जि.नाशिक) व एस.पी.बोडखे (रा.डोंबिवली, ता.कल्याण, जि.ठाणे) याच्याशी गणेश गढरी यांची ओळख करुन दिली. दरम्यान आपणास नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत 19 मार्च 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत गणेश गढरी यांचेकडून सागर बागुल यांनी त्यांच्या फोन पे वर वारंवार पैशांची मागणी करत पाच लाख 25 हजार रुपये घेतले.



फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुन्हा
गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे याने ठरावीक कालावधीत मागून पैसे देतो, असे सांगत वेळ मारुन नेली. त्यामुळे गणेश गढरी यांनी सोमवार, 22 ऑगस्ट 2022 रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदवला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !