Suicide of Bhadgaon farmer : Crime against both भडगावच्या शेतकर्‍याची आत्महत्या : दोघांविरोधात गुन्हा


Suicide of Bhadgaon farmer : Crime against both पाचोरा : भडगाव येथील मूळ रहिवासी शेतकर्‍याने आत्महत्या केल्याप्रकरणी पाचोर्‍यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मीक वामन पाटील (50, रा.चुंचाळे, ता.पाचोरा, ह.मु.भडगाव) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे तर मयत शेतकर्‍याच्या शेतावर ट्रॅक्टर कर्जाचा बोजा बसवून कर्ज न फेडणार्‍या रतन बळीराम पाटील व योगेश रतन पाटील (दोन्ही रा.चुंचाळे, ता.पाचोरा, ह.मु.गाडगेबाबा नगर, पाचोरा) यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्जफेड न केल्याने शेतकर्‍याची आत्महत्या
वाल्मिक वामन पाटील हे आपल्या कुटुंबियांसह भडगाव येथे वास्तव्यास होते शिवाय शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. चुंचाळे गावातील रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील या दोघांनी मयत वाल्मीक पाटील यांच्या शेतावर ट्रॅक्टरचा कर्जाचा बोजा बसवला मात्र दोघांनी ट्रॅक्टरसाठीचे घेतलेल्या कर्जाची परत फेड न केल्याने वाल्मीक पाटील यांनी तगादा लावला होता मात्र आरोपींना पाझर फुटला नाही.



त्रासाला कंटाळून शेतातच केली आत्महत्या
आरोपींच्या त्रासाला कंटाळून वाल्मीक पाटील यांनी रतन बळीराम पाटील यांच्या बाळद बुद्रुक शेत शिवारात विषारी औषध घेवून 22 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. दरम्यान पाचोरा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मयताची पत्नी सुरेखा वाल्मीक पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील (दोन्ही रा. चुंचाळे, ता.पाचोरा, जि.जळगाव, ह.मु.गाडगेबाबा नगर, पाचोरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !