Cotton was damaged by wild boars in Rajura राजुर्‍यात रानडुकरांनी केले कपाशीचे नुकसान


Cotton was damaged by wild boars in Rajura कुर्‍हाकाकोडा : येथून जवळच असलेल्या राजूरा शेत-शिवारातील शेतात रान डुकरांच्या टोळक्याने हाता तोंडाशी आलेल्या कपाशीच्या पिकात धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी हतबल झाला आहे .

वनविभागाकडून तोकडी भरपाई : शेतकरी संतप्त
कुर्‍हा-वढोदा परीसरातील शेती शिवाराला वढोदा वनपरीक्षेत्र अंतर्गत येते. या परीसरात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेत-शिवाराताच असतात त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नुकसान झाल्यानंतर वनविभागाकडून अत्यंत तोडकी भरपाई मिळते व तीही सहा ते सात महिने विलंबाने मिळत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होते.



50 हजारांचे नुकसान
मंगळवारी रात्री राजूरा शेत-शिवारातील गट नंबर 41/1 अलकाबाई रामसिंग मोहिते यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे रानटी डुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी संजय रामसिंग मोहिते यांनी सांगितले.
तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !