भुसावळ शहरात ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीतांना प्रतिसाद
एकात्मता अबाधीत ठेवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे
भुसावळ : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून या वैभवशाली शहरात हा अनोखा कार्यक्रम होत असून सर्वांमध्ये सौहार्दाचे वातावरण दिसत आहे. अशीच एकात्मता कायम टिकवून ठेवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले. ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भुसावळ पोलिस दल, रोटरी क्लब रेलसिटी, मातृभूमी मंडळ, श्री रीदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदींच्या संयुक्त विद्यमाने शहरातील म्युन्सीपल शाळेच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मोहन तायडे होते. उद्घाटन वाघचौरे, उद्योजक विकास पाचपांडे, जिल्हा सचिव व कलावंत तुषार वाघुळदे, ज्येष्ठ कलावंत मोहन तायडे, मकरंद चांदवडकर, दीपक नाटेकर आदींच्या उपस्थितीत झाले. ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे सचिव व कलावंत तुषार वाघुळदे म्हणाले की, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हा स्फूर्तीदायक कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विजय कोसोदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


यांचा झाला गौरव
या कार्यक्रमात माजी सैनिक लालचंद चौधरी, विलास रामदास पाटील, एकनाथ कपले, मनोज कपले, वैभव श्रीराम पाटील, भानुदास गेंदालाल गुजर, शरद वासुदेव पाटील, प्रकाश नामदेव पाटील, संतोष सीताराम पाटील, चंपालाल आनंदराव पाटील, रवींद्र चौधरी, पितांबर पाटील, अनिल अरुण कुळकर्णी, डी.डी.मोंढाळे, दिलीप मार्तंड पाटील, विजय वानखेडे, संतोष अट्रावलकर, सुधाकर कोळी, मधुकर डोळे, प्रकाश लोखंडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला. माजी पोलीस कर्मचारी अशोक जवरे तसेच पोलीस कलावंत संघपाल तायडे, संदीप बडगे यांचाही सत्कार करण्यात आला.
यांची विशेष उपस्थिती
या कार्यक्रमास डॉ.शंतनू कुमार साहू, माजी नगरसेवक किरण कोलते, पंकज महादेव, रोटरीचे मकरंद चांदवडकर, ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन तायडे, जिल्हा सचिव व कलावंत, उपाध्यक्ष व गायक मोहन गारुंगे, उद्योजक विकास पाचपांडे, पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य आनंद शहा, माजी नगरसेवक देवा वाणी आदींची विशेष उपस्थिती होती. उपस्थितांमध्ये असोसिएशनचे सदस्य कपिल घुगे, ज्येष्ठ कलावंत विजय कोसोदे, खाकी वर्दीतील गायक संघपाल तायडे आदी होते.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक नाटेकर, प्रवीण ओहोळ, विवेक शिवरामे, अनिल तायडे, दिनेश ठाकूर, पिंकी मास्टर, दिलीप इंगळे, जय सोनवणे, साई चव्हाण, संजीव पटेल, अविनाश ठाकूर, मनीष चापरे आदी पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमात कलावंत लक्ष्मी नाटेकर, विकास जंजाळे, गायत्री नाटेकर, संघपाल तायडे, संजय सुरवाडे, अनिल भालेराव, रजनी भारसके, चंद्रकांत पाटील, जगदीश बिंद्रा, खुशी वाघमारे यांनी देशभक्तीपर गाणी गायीली. सूत्रसंचालन प्रकाश लोडते आणि परवेश शेख यांनी केले तर आभार लक्ष्मी नाटेकर यांनी मानले.

