A Person In Amalner Was Cheated For 50 Thousand Online फोन पे वर कॅशबॅकची ऑफर सांगत अमळनेरच्या प्रौढाला 50 हजारांचा गंडा
A Person In Amalner Was Cheated For 50 Thousand Online अमळनेर : फोन पे वर कॅश मिळणार असल्याचे सांगून अमळनेरातील प्रौढाला ऑनलाईन भामट्यांनी 50 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑफरची भुरळ घालत घातला गंडा
या संदर्भात रवींद्र दगा चौधरी (रा.एलआयसी कॉलनी, सम्राट हॉटेल मागे, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.45 वाजता ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने चौधरी यांना फोन पेची कॅश बॅक ऑफर असल्याचे सांगून भुरळ घातली व त्यासाठी मी सांगतो तशी प्रक्रिया करा म्हणत विश्वास संपादन केला.


लिंकवर क्लीक करताच खात्यातून कपात झाली रक्कम
चौधरी यांना फोनवर भामट्याने एक लिंक पाठवली. त्यानंतर त्या भामट्याने लिंकवर क्लीक करा व तुम्हाला तो ओटीपी येईल, तो ओटीपी मला सांगा आणि मग तुम्हाला कॅश बॅक मिळेल, असे सांगितले. थोड्याच वेळात चौधरी यांच्या खात्यातून सहा हजार 882 रुपये व दुसर्या दिवशी 43 हजार 665 असे एकूण 50 हजार 548 रुपये कपात झाले. त्या दिवशी रविवार असल्याने बँक बंद असल्याने चौधरी यांनी दुसर्या दिवशी खाते बंद केले. याप्रकरणी 9883125605 या मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रमकृष्ण कुमावत करीत आहेत.

