भुसावळसह रावेरला ज्युनियर गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 22 वी 19 वर्षातील (सब-जुनियर) गटातील मुला/मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा उदगीर (लातूर) येथे 9 ते 11 सप्टेंबर 2022 होत आहे़ या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 28 रोजी सकाळी 10.30 वाजता नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर भुसावळ व दुपारी दोन वाजता व्ही.एस.नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर रावेरात होईल.
संपर्क साधण्याचे आवाहन
30 जुलै 2003 नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, प्रा.आनंद उपाध्याय, प्रा.मनोज वारके, प्रा.आसीफ खान, क्रीडा शक्षक रमण भोळे, प्रदीप साखरे, राजू कुलकर्णी, गोपाळ जोनवाल, विनय काळे, विजय संकट, प्रतीक कुलकर्णी, खुशाल देशमुख, युवराज माळी, प्रतिक खराले, अंकित महाजन, तन्मय दाभाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.



