खिर्डी येथे अजगराने बकरी केली फस्त
खिर्डी : रेंभोटा शिवारात अजगराने बकरीचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी घडल्याने पशू पालकांमध्ये भीती पसरली आहे. रेंभोटा शिवारातील लोखंडी रेल्वे पुलाजवळून विवरा गावातील सांडपाणी आणि शेतशिवाराचे पाणी वाहण्यासाठी असलेल्या नाल्याजवळ पशुपालक आपली जनावरे चरण्यासाठी आणतात व बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या भल्या मोठ्या अजगराने कळपातील बकरीला तीन चार वेटोळे मारत तिचा फडशा पाडला, असे प्रत्यक्षदर्शी दीपक तायडे यांनी सांगितले.

