50 हजारांसाठी विवाहितेचा छळ : तिघांविरोधात गुन्हा


Harassment of married women in Chalisgaon; Crime against mother-in-law along with husband चाळीसगाव : आमोदा, ता.यावल येथील सासर व चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने तिचा शारीरीक मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू-सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे न आणल्याने गांजपाठ
धनश्री दीपक शिंदे (रा.आमोदा ता.यावल, ह.मु.ओझर, ता.चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 एप्रिल 2019 पासून ते 30 एप्रिल 2022 पर्यंत पती दीपक देविदास शिंदे याने माहेरून 50 हजार रुपये आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तर सासरे देविदास जालम शिंदे आणि सासू शोभाबाई देविदास शिंदे (सर्व रा.आमोदे ता.यावल) यांनी मारहाण करुन शिविगाळ करीत फिर्यादीचा गांजपाठ केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !