Speeding truck hits ST : Two Passengers Killed On The Spot भरधाव ट्रक एस.टी.वर आदळले : दोघे प्रवासी जागीच ठार


Speeding truck hits ST : Two Passengers Killed On The Spot सोलापूर : राज्यात एस.टी.च्या अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. भरधाव ट्रक व बसमध्ये झालेल्या अपघात दोन प्रवासी जागीच ठार झाले तर अन्य सहा जखमी झाले. हा अपघात सोनके येथे गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास झाला. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दोन प्रवासी जागीच ठार
पंढरपूरहून आटपाडीकडे जाणार्‍या एस.टी.बसला समोरून येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून 6 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस प्रशासनाची धाव
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिस दलाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. त्यात अनेकांचा जीव जात आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !