वाढदिवसाला अनावश्यक खर्चाला फाटा देत चाळीसगावात पार पडला दिव्यांग बांधवांचा आदर्श विवाह

युवा उद्योजक वर्धमान धाडीवाल यांचा स्तुत्य उपक्रम


चाळीसगाव :शहरातील युवा उद्योजक वर्धमान धाडीवाल यांनी मित्र परीवाराच्या मदतीने चाळीसगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी आदर्श काम उभे केले आहे. दिव्यांग बांधवांसाठी स्वखर्चाने विविध उपक्रम ते नियमितपणे राबवित असतात. वर्धमान धाडीवाल यांनी त्यांचे वडिल सुभाषचंद्र धाडीवाल हयांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 24 ऑगस्ट रोजी दिव्यांग वधू -वरांचा चौथा विवाह मोठ्या थाटामाटात केला.

अनावश्यक खर्चाला फाटा : समाजापुढे आदर्श
वर्धमान धाडीवाल यांनी आपल्या वडिलांचा वाढदिवसाला अनावश्क खर्च टाळत वाढदिवसासाठी होणारा खर्च दिव्यांगांच्या विवाहासाठी खर्च करत समाजापुढे आदर्श उभा केला. त्यांच्या या आदर्शवादी कृतीचे विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले. या विवाहासाठी स्वयंदीप अपंग विकास संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई निकम, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य पदाधिकारी दिलीप घोरपडे, आबासाहेब गरूड, नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, भगवान राजपूत, बंटी ठाकूर, सुभाषचंद्र धाडीवाल, विजय गवळी, चाळीसगाव विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, गणेश गवळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या भाषणातून वर्धमान धाडीवाल यांच्या कार्याचा गौरव
यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त करतांना वर्धमान धाडीवाल हे दिव्यांग बांधवांसाठी करत असलेल्या सेवेचे कौतुक करत वर्धमान धाडीवाल हे प्रसिध्दीसाठी हे काम करत नसून समाजाचे ऋण फेडण्याचे काम करत आहे. त्यांचे सामाजिक कार्य हे आदर्शवादी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगसेवक रामचंद्र जाधव यांनीदेखील मनोगत करतांना वर्धमान धाडीवाल यांच्या कार्याचे कौतुक केले. सेवानिवृत्त सैनिक आबासाहेब गरूड यांनी मनोगत व्यक्त करतांना वर्धमान धाडीवाल व त्यांचे मित्र परीवार करत असलेल्या समाजसेवेचे कौतुक केले. स्वयंदीप अपंग संस्थेचे अध्यक्षा मिनाक्षीताई निकम यांनी मनोगत व्यक्त करतांना दिव्यांग बांधवासाठी वर्धमान धाडीवाल व त्यांचा मित्र परिवार दिव्यांग बांधवांसाठी करत असलेल्या सामाजिक कामाचे मनापासून कौतुक केले. विवाहासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांग वधू सपना व दिव्यांग वर दादाभाऊ यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !