Harassment of Manvel’s wife, case filed against three मनवेलच्या विवाहितेचा छळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Harassment of Manvel’s wife, case filed against three यावल : तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा पतीसह तिघांनी मानसिक छळ केला व गांजपाठ केला तसेच तिला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
मनवेल, ता.यावल येथील रूपाली हरीश जाधव (२७) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह १७ डिसेंबर २०१८ मध्ये धुळे येथील हरीश नवल जाधव यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांचे पती हरीश नवल जाधव, सासू जिजाबाई नवल जाधव, व जेठ प्रमोद नवल जाधव या तिघांनी तिला किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत मानसिक छळ केला, गांजपाठ केला व शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या तिघाविरुद्ध यावल पोलिसात विवाहितेचा छळ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !