यावल शहरात मोकाट गुरांनी घेतला एकाचा बळी
यावल : गुरांच्या धडकेने अत्यवस्थ झालेल्या 62 वर्षीय प्रौढाचे उपचारादरम्यान जळगाव निधन झाले आहे. नथ्थू यशवंत पाटील-बारी (62, योग पेठ, बारी वाडा, यावल) असे मयताचे नाव आहे.
मोकाट गुरांनी घेतला प्रौढाचा बळी
सहा दिवसांपूर्वी मोकाट व बिथरलेल्या गायीने नथ्थू बारी यांना योग पेठमध्ये जबर धडक दिली होती. यावलला प्रथमोपचार करून बारी यांना जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र डोक्याला जबर दुखापत झाल्याने नंतर बारी हे थेट कोमात गेले व उपचारादरम्यान त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. दरम्यान, यावल पालिकेकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मोकाट गुरांविरोधात कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

