भुसावळात कोम्बिंगमध्ये अडकले वॉरंटमधील सहा पसार संशयीत
भुसावळ : भुसावळ शहरातील गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव या पार्श्वभूमीवर सण शांततेमध्ये व उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्यात यावे व्हावे यासाठी पोलिसांतर्फे शनिवारी रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत ही मोहिम राबविण्यात आली. यात अटक वॉरंट, संशयीतरित्या फिरणारे दोन जणांना ताब्यात घेतले तर 12 पान टप्यांवर तंबाखुजन्य पदार्थ आढळल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात आली.
यांनी केली कारवाई
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानप पडघन, निरीक्षक राहूल गायकवाड, निरीक्षक विलास शेंडे, शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी ऑल आऊट मोहिम राबविली होती, यात अटक वॉरंट बजावणी, न्यायालयाने विविध गुन्ह्यातील फरार व्यक्तींना पकडण्यासाठी काढलेल्या सहा व्यक्तींना अटक करून अटक वॉरंट बजावणी करण्यात आली. 19 तसेच बेलेबल वॉरंट बजाविण्यात आले तरी 79 समन्सची बजावणी करण्यात आली.

तीन जुगारांवर छापे
अवैध दारू धंद्यांवर छापे मारले त्यात पाच ठिकाणी छापे मारले. यात बाजारपेठ, शहर पोलिस ठाणे, तालुका हद्दितील दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. यात जुगारावर छापे मारले. तीन ठिकाणी जुगारावर छापे मारले. शहरात रात्री संशयीतरित्या फिरत असलेल्या दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली. तंबाखू व तंबाखूजन्य प्रतिबंधक पदार्थ 12 पान टपरी चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली. विना नंबर प्लेट असलेल्या 17 वाहन धारकांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेने सहा ड्रंक अॅण्ड ड्राइंव्हच्या केसेस केल्यात. याशिवाय 21 हिस्टरीशीटर्स तपासणी केले.
