Decomposed body of a woman was found in a well near Chinchpura चिंचपुराजवळ विहिरीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह
Decomposed body of a woman was found in a well near Chinchpura धरणगाव : चिंचपुरा गावाच्या अलीकडे एका विहिरीत महिलेचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळला असून ही आत्महत्या केली घातपात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विहिरीत आढळला मृतदेह
येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आढळून आला. संबंधित महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, अशी माहिती आहे. ही महिला पावरा समाजातील असून तीचा पती आणि ती पिंप्री येथे वास्तव्यास होते. रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगतांना काही लोकांना दिसला. त्यानंतर गावात वार्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

धरणगाव पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी धाव घेतली. मयत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, ही दुर्घटना की आत्महत्या?, हे पोलीस तपासातच समोर येणार आहे.
