Obscene video sent on Whatsapp of Jalgaon girl जळगावातील युवतीच्या व्हॉटसअॅपवर पाठवले अश्लील व्हिडिओ
Obscene video sent on Whatsapp of Jalgaon girl जळगाव : जळगावातील युवतीच्या व्हॉटसअॅपवर बदनामीकारक तथा लज्जा उत्पन्न होईल, असे व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात जामनेरच्या मो.आकीब शे.मोहमद रफिक (रा.जुना बोदवड रोड, जामनेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताविरोधात गुन्हा
पीडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयीत आरोपी मो.आकीब शे.मोहमद रफिक याने रविवार, 14 ऑगस्ट ते सोमवार, 15 ऑगस्टच्या दरम्यान पीडीतेच्या मोबाईलवर तिच्या नावाने बदनामीकारक व लज्जा उत्पन्न होईल, असे स्टेटस व व्हिडीओ व्हॉटसअॅपवर पाठवले. याप्रकरणी मो.आकीब शे.मोहमद रफिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास हवालदार महेंद्र उदेसिंग पाटील करीत आहेत.

