Manur Budruk farmer commits suicide by consuming poison मनूर बुद्रुक येथील शेतकर्‍याची विष प्राशन करीत आत्महत्या


Manur Budruk farmer commits suicide by consuming poison बोदवड : सततचे कर्ज व नापिकीला कंटाळून तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील सचिन प्रकाश पाटील (35) यांनी रविवार, 28 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आपल्या कुर्‍हा शिवारातील शेतात विषारी द्रव सेवन केले होते. ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवल्यानंतर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शेतकर्‍याच्या आत्म्हत्येने मनूर येथे हळहळ
शवविच्छेदन केल्यानंतर शेतकर्‍यावर मनूर ब्रूद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकर्‍याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !