जळगावातील अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवले


A minor girl from Jalgaon was lured away जळगाव : अज्ञाताने शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीला पळवले. रामानंदनगर पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताने फूस लावून पळवले
जळगाव शहरातील एका भागात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तिला सोमवार, 29 रोजी रात्री 8.00 वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून किंवा ती कुठे तरी निघून गेली असल्याचा संशयावरून पीडित मुलीच्या वडिलांनी रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली.



अज्ञाताचा पोलिसांकडून शोध
पीडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्व अल्पवयीन मुलीला नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोपाळ देशमुख करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !