सुप्रीम कॉलनीत वयोवृद्धाची गळफास घेत आत्म्हत्या


जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी येथे राहणार्‍या 70 वर्षीय वयोवृद्धाने गळफास घेतला. ही घटना शनिवार, 3 सप्टेंबर रोजी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. हुसेन गयास पटेल (70) असे मयताचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात नोंद
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी असलेल्या मज्जिद जवळ हुसेन गयास पटेल (70) हे वयोवृद्ध आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. शनिवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या पूर्वी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !