Extortionists In Jalgaon City Police Net  खंडणीखोर जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


Extortionists In Jalgaon City Police Net जळगाव : औषध विक्रेत्याकडून खंडणी मागणार्‍या जळगाव शहर पोलिसांनी अटक केली. अजीज खान बाबु खान पठाण (रा. गेंदालाल मिल जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने बळजबरी साडेआठ हजार रुपये शहरातील शिवाजी नगर हुडको भागात गेंदालाल मिल कॉम्पलेक्समधील एका मेडीकल दुकानातून काढून घेतले.

खंडणीसाठी दिली धमकी
31 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल कॉम्प्लेक्समधील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांच्या रामकृष्ण मेडीकल दुकानावर जावुन अजीज खान बाबु खान पठाण याने कंबरेला चॉपर टेबलावर ठेवुन महिना पाच हजार खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली होती. बाळासाहेब पाटील यांनी नकार दिल्यावर तुला धंदा करू देणार नाही अशी धमकी देवून चापटाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या मेडीकल दुकानाच्या गल्यातील 8,500 रुपये रोख जबरीने काढुन नेले होते. या प्रकरणी शहर पो.स्टेला गुरन 282/2022 भादंवि कलम 394.384,385,323,506 प्रमाणे दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !