अवैध वाळू वाहतूक : तिघा आरोपींना अटक


रावेर : अवैध वाळू वाहतूक करणार्‍या तिघा आरोपींना ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अटक करण्यात आली आहे. तहसीलदार व महसूल पथकाच्या टिमने कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉली पकडली होती परंतु संबंधी वाळु वाहतूकदार यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.34 बी.जी.1901) हे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या पथकाने पकडले होते. यावेळी घटनास्थळीच वाळु खाली टाकून वाद-विवाद करून तहसील कार्यालयात ट्रॅक्टर न आणता संबेधीत पळाले होते. त्यातील आरोपी शे.आरीफ.शे.चिराग (42), ट्रॅक्टर मालक शे.साबीर.शे.ईसा (23) व चालक रवींद्र ज्ञानेश्वर मेढे (29) यांना 6 रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान अटक करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, कॉस्टेबल निलेश लोहार अधिक तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !