In Bhusawal Division, Vighnaharti was bid farewell by his mother-in-law… भुसावळ विभागात विघ्नहर्त्याला साश्रूनयनांनी दिला निरोप…
भुसावळकरांनी गुलालाऐवजी केली कागदी फुलांची उधळण : रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडल्या मिरवणुका
In Bhusawal Division, Vighnaharti was bid farewell by his mother-in-law… भुसावळ : शहर व परीसरात विघ्नहर्त्या गणरायाला भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत साश्रूनयनांनी निरोप दिला. पोलिस दप्तरी संवेदनशील असलेल्या भुसावळात गुलालाचा अल्प वापर करीत मंडळांनी कागदी फुलांची उधळण करीत नवीन पायंडा पाडला. भुसावळातील मातृभूमी मंडळांनी यंदा हा आदर्श पायंडा घालून समाजात आदर्श निर्माण केला. शहरातील शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मिरवणुकांचा समारोप झाला. मुख्य मिरवणुकीत 41 मंडळे सहभागी झाले.


जय गणेश मंडळ मिरवणुकीच्या अग्रभागी
भुसावळातील जयगणेश मंडळा यंदाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी होते. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याहस्ते मंडळाच्या गणरायाची आरती केल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरूवात झाली. दांड पट्टा चालविणार्या पथकाचे मिरवणुकीत विशेष आकर्षण होते. लक्ष्मी चौकात दांड पट्टा चालवत पायाखालील निंबू कापणे, दंड (काठ ) फिरवत हातातील नारळ काठीने फोडणे असे कसब पथकाने दाखविले तसेच बालकांचे टाळ मृदूंग वाजविणे, फुगडीनेही लक्ष वेधले. लक्ष्मी चौकात गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, मुख्य मिरवणुकीत पोलिस प्रशासनासह पालिका प्रशासनातील अधिकारीदेखील थिरकले.
अपर अधीक्षक ठाण मांडून
मुख्य मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री अखेरचे मंडळाचे विसर्जन होईपर्यंत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार ठाण मांडून होते.
तापी किनारी चोख बंदोबस्त
तापी नदीवर घरगुती व अनेक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पालिकेने नेमलेल्या पथकाकडून करण्यात आले. मूर्तीदान तसेच निर्माल्य स्वीकारण्यासाठीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. माल्यार्पण नदीत टाकले जाऊन नये यासाठी पथक खबरदारी घेण्यात आली. तापी नदीवर गणेश विसर्जनासाठी येणार्या भाविकांसाठी यावल रोडवरील साई जीवन सुपर शॉप येथे खिचडी, बटाट्याची भाजी व पुरी वाटप करण्यात आली.
वरणगावात तुरटीच्या गणपत्ती बाप्पांचे विसर्जन
वरणगाव : भारतीय जनता पार्टीतर्फे जगदंबा नगरातील भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तुरटीच्या श्रींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी वाद्याच्या तालावर ठेका धरून जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, भाजयुमो अध्यक्ष आकाश निमकर, बळीराम सोनवणे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, नटराज चौधरी, रमेश पालवे, जिल्हा चिटणीस अरुण बावणे, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, मुस्लिम अन्सारी, नूरू सेठ, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, सरचिटणीस योगेश माळी, गजानन वंजारी, डॉ.नाना चांदणे, राहुल जंजाळे, शाम सुरळकर, कैलास पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सावदा येथे भावपूर्ण वातावरणात गणरायास निरोप
सावदा : शहरात मुख्य मिरवणुकीत शहरातील सुमारे 22 मंडळे सहभागी झाली. सकाळी 11 वाजेपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात झाली. लहान-बाळगोपाळ यांनीदेखील ढोल-ताशांच्या गजरात सहभाग नोंदवला. शहरातील इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, चांदणी चौक, गांधी चौक, गवत बाजार, शिवाजी चौक, मोठा आडमार्गे मुख्य मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण, व गणपती बाप्पा चा जयघोष यावेळी निनादत होता, मिरवणुकीत, गांधी चौक मित्र मंडळ, संभाजी मंडळ, चैतन्य मंडळ, संताजी मंडळ, अमर मंडळ, एकता मंडळ, मोरया मंडळ, राणा मंडळ, शारदा मंडळ, गवत बाजार मंडळ, साळी बाग मंडळ, अजिंक्य मंडळ, प्रभात मंडळ, बुधवार पेठ मंडळ, यांचे सह अनेक मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. ठिकठिकाणी मिरवणुकीवर फुलांचा वर्षावदेखील करण्यात आला. शाम अकोले परीवारातर्फे गणेश भक्तांसाठी पुरी व भाजी वाटप करण्यात आली. यावेळी सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले व पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांनी तसेच होमगार्ड जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला. हतनूर धरणावर मंडळांनी गणेश विसर्जन केले.
