शास्त्रीय संगीत ऐकल्याने आजार बरे होण्यास मदत : डॉ.नारायण आर्वीकर


भुसावळ : शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर त्याचे आरोग्यावर सकारात्मक परीणाम होतात शिवाय विशिष्ट आजारात योग्य ते राग ऐकल्याने आजार बरे होण्यास मदतही होते, असे मत संगीत शास्त्राचे अभ्यासक डॉ.नारायण आर्वीकर व डॉ.माया आर्वीकर यांनी शहरात व्यक्त केले. शहरातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेत ते बोलत होते. उभयंतांनी प्रसंगी रागाची बंदिश गाऊन त्यावर आधारीत गीते सादर केली तसेच यमन ते भैरवीपर्यंतच्या रागांविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी सुंदर व सुरेल आवाजात पेटीवर गाणी गावून रांगाचे महत्वही सांगितले.

यांची होती उपस्थिती
मान्यवरांचा सत्कार आप्पासाहेब सोनवणे, अलका ढाके यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केला. पाहुण्यांचा परीचय जी.आर. (मामा) ठाकूर यांनी करून दिला. अलका ढाके यांनी सूत्रसंचालन केले. रामनाम जप दिनकर बेंडाळे यांनी व परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन कुसुम पाटील यांनी तसेच आभार उपाध्यक्ष सुरेश कुरंभट्टी यांनी केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता मदन बोरकर यांनी केली .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !