Attention Passengers : 66 railway Trains Canceled During Navratri Festival प्रवाशांनो लक्ष द्या : ऐन नवरात्रोत्सवात 66 रेल्वे गाड्या रद्द


Attention Passengers : 66 railway Trains Canceled During Navratri Festival मुंबई : ऐन नवरात्रोत्सवात रेल्वे प्रशासनाने 66 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगड आणि झारसुगुडा स्थानकांदरम्यान चौथ्या मार्गाच्या बांधकामासाठी 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत प्री-एनआय आणि एनआय (नॉन इंटरलॉकिंग) काम करण्यात येणार असल्याने रेल्वे गाड्या रद्दचा निर्णय घेण्यात आला. या सर्व गाड्या 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या वेगवेगळ्या तारखांना प्रभावित होतील.

असे आहे गाड्या रद्द झाल्याचे शेड्युल
12130 हावडा-पुणे – 21 ते 28 सप्टेंबर
12129 पुणे-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
12810 हावडा-सीएसएमटी – 21 ते 28 सप्टेंबर
12809 सीएसएमटी-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
12860 हावडा-सीएसएमटी – 22 ते 29 सप्टेंबर
12859 सीएसएमटी-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
18030 शालीमार-एलटीटी – 21 ते 28 सप्टेंबर
18029 एलटीटी-शालीमार – 21 ते 28 सप्टेंबर
22846 हटीया-पुणे – 23 व 26 सप्टेंबर
22845 पुणे -हटिया – 25 व 28 सप्टेंबर
12880 भुवनेश्वर -एलटीटी – 22, 26 व 29 सप्टेंबर
12879 एलटीटी -भूवनेश्वर – 24, 28 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर
12905 पोरबंदर -शालिमार – 21,22,28 व 29 सप्टेंबर
12906 शालिमार- पोरबंदर – 23,24,30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर
22905 ओखा – शालीमार – 25 सप्टेंबर
22906 शालीमार – ओखा – 27 सप्टेंबर
13425 माल्दा टाऊन – सुरत – 24 सप्टेंबर
13426 सुरत – माल्दा टाऊन – 26 सप्टेंबर
12151 एलटीटी -शालीमार – 21, 22 व 28 सप्टेंबर
12152 शालिमार-एलटीटी – 23, 24 व 30 सप्टेंबर
22894 हावडा-साईनगर शिर्डी – 22 व 29 सप्टेंबर
22895 साईनगर शिर्डी-हावडा – 24 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !