86 टक्के घरकुले पूर्ण केल्याने रावेरच्या डी.एम.देवरेंचा राज्यपालांकडून सन्मान


रावेर- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल आवास योजना अंतर्गत प्रथम टप्प्यात 86 टक्के घरकुले पूर्ण करून नागपूर विभागात कोरची तालुक्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्याला मिळाला आहे. तेथील गट विकास अधिकारी डी.एम.देवरे हे रावेर शहरातील रहिवासी असून त्यांच्या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेंतर्गत ही घरकुल बांधण्यात आली आहेत. कोरची हा शंभर टक्के नक्षली भाग असून आदिवासी बहुल क्षेत्र आहे.या आदिवासी भागात घर बांधकाम करण्यासाठी अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असतााही देवरे यांनी तब्बल 86 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

राज्यपालांच्या हस्ते सन्मान
आदिवासी भागात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांनी राज्यस्तरीय नागपूर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्य सचिव अजय मेहता, प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक धनंजय माळी यांनी प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला.

आदिवासी बांधवाना घरे मिळाल्याचे समाधान
कोरची हा नक्षलवादी भाग असून वेगवेगळ्या ठिकाणी रहिवास करण्यार्‍या आदिवासी बांधवांना त्यांना हक्काचे घरे मिळाल्याचे समाधान आहे. यापुढेदेखील आदिवासी बांधवांसाठी मी काम करत राहणार असल्याचे कोरची (जि.गडचिरोली) येथील गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !