भुसावळात 24 रोजी तेजोमय नादब्रह्म दिवाळी पहाट कार्यक्रम


भुसावळ : शहरातील साई चौक विकास कॉलनी मित्र मंडळातर्फे षदिवाळी पहाटय हा सुरेल मराठी व हिंदी भावसंगीताचा तेजोमय नादब्रह्म कार्यक्रम सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 5.45 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

भुसावळकरांची आनंदमयी दीपावली होणार साजरी
भुसावळच्या चोखंदळ रसिकांची स्वरमयी आणि आनंददायी दीपावली साजरी करण्यासाठी हा आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गायक वरुण नेवे, भाग्यश्री भंगाळे, किरण सोहळे तर हार्मोनियम वादक गणेश देसले तबला व तालवाद्य सुयोग गुरव राहतील. कार्यक्रमाचे निवेदन किरण सोहळे करणार आहेत. रसिकांनी उपस्थित राहून तेजोमय नादब्रह्म या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ.छाया मुरलीधर फालक (देशमुख), मोरया डीजे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते रूपेश देशमुख व समाजसेवक लखन देशमुख यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !