18-year-old girl commits suicide by hanging : An Unfortunate Incident In Pachora City 18 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या : पाचोरा शहरातील दुर्दैवी घटना


18-year-old girl commits suicide by hanging : An Unfortunate Incident In Pachora City पाचोरा : 18 वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील श्रीराम चौकात शनिवार, 22 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रोहिणी प्रवीण मिस्तरी (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौकात रोहिणी ही कुटूंबासह वास्तव्यास हेाती. शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता तरुणी घरात एकटीच असतांना तिने घराच्या छताला गळफास घेतला. हा प्रकार शेजार्‍यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. रोहिणीला तत्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. रोहिणीने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवू शकले नाही. मयत रोहिणीच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !