Burning of vehicles in Jalgaon : Two bikes along with a car were burnt जळगावात वाहनांची जाळपोळ : कारसह दोन दुचाकी जाळल्या
Burning of vehicles in Jalgaon : Two bikes along with a car were burnt जळगाव : विकृतांकडून वाहनांना आग लावल्याचे प्रकार शहरात थांबलेले नाहीत. पुन्हा चारचाकीसह दोन दुचाकींना आग लावल्याची घटना जळगावच्या गणपती नगरात इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे घडली आहे. हा प्रकार रात्री उशिराने घडला असलातरी शनिवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
कुंपणात प्रवेश करीत जाळली वाहने
संतोष मोहन तलरेजा (45) यांच्या मालकीच्या दोन दुचाकी (एम.एच.19 डी.आर.4498) व (एम.एच.19 डी.झेड.6698) तसेच प्रीतम थारुमल बठेजा (50) यांच्या मालकीची कार (एम.एच.12 क्यू.वाय.1007) मध्यरात्री जाळण्यात आली. ही वाहने घराच्या कंपाऊंडमध्ये पार्कींग केली असताही हा प्रकार घडला. तलरेजा यांचे भाडेकरु चंकी वालेचा यांना पहाटे तीन वाजता वाहने जळत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड केल्याने झोपलेले संतोष तलरेजा यांनी भाऊ सुशील यांना बोलावून जळत असलेली वाहने विझवली. त्यानंतर वाहने जाळणार्याचा परीसरात शोध घेण्यात आला मात्र संशयीत तोपर्यंत पसार झाला.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
तलरेजा यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, रेवानंद साळुंखे व इतरांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याशिवाय परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली परंतु कुठेच काही मिळाले नाही. आधीच्या एका घटनेत विकृताने नशेत हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.